बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

मुंबई | राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयानं राज्याचा कारभार चालत असतो. केंद्राला निधीच्या माध्यमातून राज्य सरकारची मदत करता येते. पण महाराष्ट्रात 2019 पासून केंद्र आणि राज्य असा नवा संघर्ष पहायला मिळत आहे. परिणामी भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारकडून मदत निधी प्राप्त होत नाही, अशी तक्रार वारंवार महाविकास आघाडीकडून करण्यात येते. त्यावर एका बातमीचा हवाला देत भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.केंद्राने पैसे पाठवले पण ठाकरे सरकारने वापरले नाही. युपीए सरकारपेक्षा अडीचपट जास्त मोदी सरकारने पाठवले पण 718 करोड शिल्लक राहिले, अशी टीका राणे यांनी केली आहे.

“संज्या म्हणेल राज्यात सर्व चांगलं चाललंय म्हणून वापरले नाही, ठाकरे सरकारने पैसे वाचवले म्हणायला पण कमी पडणार नाही संज्या”, अशी जहरी टीका संजय राऊत यांच्यावर राणे यांनी केली आहे. निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. परिणामी शिवसेनेकडूनही राणेंना प्रत्यूत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी ज्या निधीबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे तो निधी पुरग्रस्तांच्या मदतीसाठीचा आहे. राज्यात यावर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं होतं. परिणामी हा निधी केंद्रानं दिल्याचं सांगतिलं गेलं आहे. पण राज्य सरकारकडून राणे यांच्या या टीकेला काय उत्तर मिळतं ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

चंद्रकांत पाटलांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज, म्हणाले ‘जनतेच्या मैदानातही…’

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी

Omicron किती धोकादायक?; आयसीएमआरने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

‘…असं काही घडलंच नाही’; 12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

“…त्याची ठाकरे सरकारला जराही शरम वाटली नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More