महाराष्ट्र मुंबई

“काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर आश्चर्य वाटायला नको”

मुंबई |  काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्ष भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असं टोला भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत युतीला 51 टक्क्यांहून जास्त मतदान मिळालं. गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत होतं. या निवडणुकीत ते वाढेल पण कमी होणार नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सत्तेत असून शिवसेनेने मोर्चा काढला आणि महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं तर त्यात चुकीचं काहीच नाही. सरकार चुकत असेल तर सहयोगी पक्षाने सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मोदीजींचे सेनापती म्हणून चंद्रकांत दादांना ही जबाबदारी मिळाली आहे. ते ती योग्य रितीने पार पाडतील, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांच्या निवडीचं स्वागत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदीजी तुमचे खूप खूप आभार…; कुलभूषण जाधव केसप्रकरणी सुषमा स्वराज यांना अत्यानंद

-कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मोठा निर्णय

-…म्हणून अरविंद केजरीवाल यांनी केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक!

-घराशेजारी कसले मोर्चे काढता???; नवाब मलिकांची शिवसेनेवर टीका

-ज्यांनी पैसे द्यायला हवे तेच मोर्चे काढतायेत; बाळासाहेब थोरातांचं शिवसेनेवर टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या