पुणे | भोसरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन सुरु असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा घोळ अद्याप कायम आहे. आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आपला अधिकृत उमेदवार देणार की नाही? याची चर्चा आता मतदारसंघात जोर पकडू लागली आहे.
महेश लांडगे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते… २०१४ साली त्यांनी बंड पुकारत अपक्ष विधानसभा लढवली आणि राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांना धूळ चारत विजयश्री खेचून आणली.
तेच महेश लांडगे आता भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला.
दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीत या जागेवरुन घोळ सुरु असल्याचं चित्र आहे. दत्ता साने यांनी याठिकाणी पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याचा दावा करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, मात्र पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. विलास लांडे याठिकाणी पक्षाच्या तिकीटावर लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांना अद्याप पक्षाकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार महेश लांडगेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन – https://t.co/J06sAL59gr @MLAMaheshLandge
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
झुंडबळी प्रकरणी मोदींना पत्र लिहणाऱ्या 49 सेलिब्रिटिंविरोधात एफआयआर; लावला देशद्रोहाचा कलम https://t.co/ht0qmj6iAC @narendramodi @BJP4India
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
…नाहीतर पक्ष बरबाद होईल; ‘या’ काँग्रेस नेत्याचा इशारा- https://t.co/Pyh4lJ4Bcc @sanjaynirupam @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.