लखनौ | उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर याची भाजपतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विरोधी पक्ष, सोशल मिडिया अशा सर्वच स्तरातून दबाव वाढल्यानंतर भाजपने ही कारवाई केली आहे.
गेल्या आठवड्यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला रायबरेलीत झालेल्या अपघातात पीडितेच्या काकू, मावशी आणि कार ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. तर पीडितेची आणि वकिलांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामागे आमदार सेंगरचाच हात असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार सेंगर हा मुख्य आरोपी आहे. 2017 पासून त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी पिडितेबाबत विचारपूस केली आहे. यासोबतच या अपघात प्रकरणाची 7 दिवसात चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मी हृदयात राहतो म्हणणाऱ्यांचं हृदय चेक केलं पाहिजे- शरद पवार
-“ओवैसींसारखे लोक अल्लाच्या नावाखाली मुस्लिम समाजाला मूर्ख बनवतायेत”
-दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा
काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी धक्के; भाजपमधील दुसऱ्या मेगाभरतीची तारीख ठरली
-आता डासांचा खात्मा; नवनीत राणांच्या हाती धूरफवारणी यंत्र
Comments are closed.