बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत वरूण गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. देशातील शेतकरी बरेच दिवस राजधानी दिल्ली येथे ठाण मांडूण बसले होते. आता यावरून भाजप खासदार वरूण गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वरूण गांधी यांनी शेअर केलेला अटल बिहारींचा एक व्हिडीओ 1980 सालचा आहे. ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा इंदीरा गांधी सरकारला इशारा दिला होता.  ‘मी सरकारला इशारा देतो की, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात दबाव टाकण्याच्या पद्धती सोडून द्याव्यात. शेतकरी घाबरणारे नाहीत. शेतकऱ्यांना घाबरवण्याच प्रयत्न करू नका’, असा इशारा दिला होता.तसेच आंदोलनात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला होता.

‘विशाल ह्रदय असलेल्या नेतृत्वाचे शब्द’, असं ट्विटमध्ये म्हणत वरूण गांधी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी जर सरकार दबाव तंत्र चालणार असेल तर शेतकऱ्यांच्या संघर्षात उडी घेण्यासाठी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा राहून मागे उभा राहू, असा इशारा इंदिरा गांधी सरकारला दिला होता.

दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. वाजपेयींचा हा व्हिडीओ ट्विट करत वरूण गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारला सुनावलं आहे. वरूण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली आहे. कान टोचले आहेत. नुकत्याच जाहिर झालेल्या भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यकारिणीमधून वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मेनका गांधी यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्याचं सांगितलं जातंय.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय”

‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून…’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

…म्हणून मी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली; हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा

आपण फक्त टगे पोसतोय, हे त्यांना समजलं पाहिजे’; प्रीतम मुंडेंचा घणाघात

‘…तर शिवसेेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते’; शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More