बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा उचलल्यापासून राज्यभर खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगलेला पहायला मिळाला. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठीच केला, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपने मनसेला पुढे करुन हा विषय चर्चेत आणला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असंही राऊत यांनी म्हटलं.

राज ठाकरेंच्या या निर्णयानं हिंदू नाराज झाले आहेत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु झालं आहे हिंदूमध्ये संताप आहे पण हिंदूनी आता संयम बाळगला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान,  भोंग्यांचं आंदोलन हे एक दिवसाचं नसून 365 दिवस चालणारं आंदोलन आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मला दंगल भडकवायची असती तर….”; राज ठाकरे स्पष्टच बोलले…

“उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर, मात्र…

‘…तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार’, राज ठाकरे स्पष्टच बोलले

“जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More