“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”
मुंबई | काल ठाकरे सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संपुर्ण अनलॉकची घोषणा केली नाही. त्याउलट त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आले आहेत. त्यावरून आता भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. राज्यात आता सर्व काही सुरू झालं आहे. राज्याने निर्बंधामध्ये शिथीलता दिली असताना ठाकरे सरकारने मंदिरं उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. नियमानुसार आता सर्वकाही सुरू झालंय. त्यामुळे आता ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरे सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, असं तुषार भोसले यांनी म्हटलंय. मंदिरं सुरू ठेवायला सरकारला काय अडचण आहे?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर आक्षेप घेत त्यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे,
दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालये पुर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, आमचा सीएम जगात भारी”
भारतीय पुरूष हाॅकी संघाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून भारताचा पराभव
नियतीने घात केला अन् हिमालयाएवढ्या उंचीचा, कैलास भारत पवार गेला…
लाईव्ह सेशनमध्ये अभिनेत्रीला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का, पाहा व्हिडीओ!
भारताला मिळाला ‘हा’ मोठा मान; पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार इतिहास
Comments are closed.