नागपूर | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. निवडणुका पार पडल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आज गोवा निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.
नागपूरमध्ये झालेल्या जंगी स्वागतानंतर देेवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी महाराष्ट्राविषयी वक्तव्य केलं. ‘गोवा तो एक झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातही आता परिवर्तनाची लाट सुरु झालीय. सरकारच्या भ्रष्ट्राचारविरोधी लढ्यात आता भाजपसोबत जनताही उतरली आहे. महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमतानं सरकार आणणार. ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर 1 राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणून दाखवणार, असा दावाही केला आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! राज्यपालांनी ठाकरे सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय केला रद्द
उष्णतेचा वाढता पारा पाहून हवामान खात्यानं दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…
“इतकं क्रूर पद्धतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं”
Shocking: स्वप्नात दिसलं असं काही की दुसऱ्याच दिवशी तीनं केलं बाॅयफ्रेंडसोबत ब्रेकअप
Corona Update: कोरोनाबाबत WHOनं दिला गंभीर इशारा, म्हणाले…
Comments are closed.