ठाणे | राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड नेहमी त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून आव्हाडांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्र सरकारच्या सर्व प्रकरणात माध्यांवर आव्हाड आपली बाजू मांडत असतात. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण विरोधी आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केले आहे.
भाजप सरकार येत्या काळात आरक्षणावर पाऊल उचलेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हळूच बाजूला सारेल असं माझं स्पष्ट मत आहे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. याचसोबत ज्या संविधानात आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. आंदोलनजीवी को रोकना होगा याचा अर्थ काय होतो?, असा सवालही आव्हाडांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख जेष्ठ नाटककार असा केला. मोदी भुलभुलैया करण्याचं काम करतात. सरकारने कंपन्या विकायचा धडाका लावलाय. अशी घणाघाती टीकाही आव्हाडांनी त्यांनी केली. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर बोलणारे जेष्ठ कलावंत आज चिडीचुप आहे, असंही आव्हाडांनी बोलून दाखवलं. या कार्यक्रमात आव्हाडांनी अंबरनाथ-बदलापुर मधील पाण्याचा प्रश्नावर बोट ठेवत शिवसेनेच्या खासदारावर टीका केली.
थोडक्यात बातम्या-
पोलीस मारहाण प्रकरणात राज्यातील ‘या’ भाजप आमदाराला अटक
राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर- शरद पवार
मारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका
…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय