बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत”

नवी दिल्ली | एकीकडे केंद्र सरकारने इंधनावरील करामध्ये कपात करून पेट्रोल- डिझेलचे दर कमी केले आहेत. त्यामुळे आता भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी देशात काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत यासाठी सोनिया गांधी यांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

केंद्राने इंधनावरील कर कमी केल्याने आता भाजप नेत्यांनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधील इतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. केद्रांप्रमाणेच राज्य सरकारनेही इंधनावरील कर कमी करावेत अशी मागणी भाजपने केली आहे. सध्या महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये इंधनावर सर्वात जास्त कर असल्याने तो कर कमी करावा अशी मागणी भाजपकडून होत आहे.

भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्य सरकारला सध्या कर कमी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या करकपातीमुळे राजस्थानमध्ये आपोआप पेट्रोल- डिझेल स्वस्त झाले असल्याचं गेहलोत यांनी सांगितलं आहे.

त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोलवर राज्य सरकारचा व्हॅट 1 रु 80 पैसे तर डिझेलवर 2 रु 60 पैसे कमी झाला असून त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल 6.8 रुपये तर डिझेल 12.60 रुपयांनी स्वस्त झालंं असल्याचं गेहलोत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, केद्रांने कर कमी केल्यानंतर हिमाचल प्रदेश, चंदीगड, हरियाणामध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे.

थोडक्यात बातम्या-

“नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही”

समीर वानखेडे नाही तर ‘हे’ अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

‘मला हटवलं नाही तर मी…’, समीर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

शाब्बास पुणेकर! पुण्यात आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More