“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ बाहेर निघालं”
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली होती. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून राज ठाकरेंनी टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर(NCP) देखील राज ठाकरेंनी निशाणा साधला. त्यातच आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांचं कालचं भाषण भाजप(BJP) ने लिहून दिलेल्या स्क्रिप्टसारखं होतं. त्यामुळे लोक आम्हाला लाव रे तो व्हिडीओ गेला कुठे?, असं फेसबुक आणि ट्विटवर विचारत आहेत. बऱ्याच मनसैनिकांनी आमच्याशी चर्चा केली. आम्हाला वाटलं होतं दोन वर्षाची मोरी तुंबलीय, त्या मोरीतून काहीतरी निघेल, परंतु, त्यातून काही निघालं नाही. तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ बाहेर निघाले, असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या मुशीत अनेक नेते घडले. त्याच मुशीतून राज ठाकरे देखील घडले. पण हे असे कसे बिघडले?, यांची उव्दिग्नता मला सतावत होती. त्यामुळेचं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर नतमस्तक होण्यासाठी गेले, अशी जोरदार टीका पेडणेकरांनी केली आहे.
दरम्यान, भाजप मांडीवरही नाही घेत आणि खांद्यावरही नाही घेत. काल ते म्हणत होते की, मला घ्याना मला घ्याना. तो आमचा नाही, तुमचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रात शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठा झालेला नाही. मुंबईकर सर्व ओळखून आहेत. बाळासाहेबांचे पक्के उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंच आहेत, हे सिद्ध झालंय, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कल दाढ आली आहे”
WHOच्या दाव्याने खळबळ, कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटने चिंता वाढली
‘राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…’; चंद्रकांत पाटलांकडून जाहीर कौतुक
“शिवतीर्थावरचा कालचा भोंगा भाजपचा आणि स्क्रिप्टही त्यांचीच”
युक्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर; विकृत अवस्थेत सापडले ‘इतके’ मृतदेह
Comments are closed.