बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काही कार्यक्रम घेणार असाल तर सावधान, ही बातमी आत्ताच वाचा नाहीतर…

मुंबई | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता बराच ओसरला आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (corona third wave) टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. त्यात डिसेंबर महिन्यात होणारे लग्न समारंभ, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्ट्या या सगळ्या माध्यमातून होणारी गर्दी आणि कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासन (BMC) सज्ज झालं आहे.

लग्नसराईचा काळ, ख्रिसमस आणि 31 डिसेंबर रोजीच्या पार्ट्यांमधील गर्दी यामुळे आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता कंबर कसली आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेनं विशेष तयारी देखील केली आहे. कोरोना नियमावलीचा कोणत्याही प्रकारे भंग झाल्यास महापालिकेने थेट कारवाईचे निर्देश दिले आहेत.

लग्न समारंभ आणि त्याबरोबरच 31 डिसेंबर रोजी हॉटेल आणि बारमध्ये होणाऱ्या इअर एंडिंग पार्टीवर (New Year Celebration) लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात महापालिकेची दोन भरारी पथकं तैनात करण्यात आली आहे. तर कोरोना नियमांचे उल्लंघन केले तर जागच्या जागी कारवाई होणार असून महापालिका या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) मदत देखील घेणार आहे.

कोरोना नियमांत मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी लग्न सोहळ्यासाठी 200 जणांची किंवा हॉल क्षमतेच्या 50 टक्के लोकांच्या परवानगीची अट अजूनही कायम आहे. तर पार्टीमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले तर सदर रेस्टॉरंट किंवा बारवर परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार असल्याचंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार?, 11 वाजता होणार महत्त्वाची बैठक

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More