मुंबई | मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट अलिबागजवळच्या समुद्रात उलटली आहे. यावेळी बोटीत 78 प्रवासी होते. मात्र सुदैवाने सर्वांची सुखरुप सुटका झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
वीकेंडचा मुहूर्त गाठत अनेक जण मुंबईहून अलिबागला जातात. शनिवारी सकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून निघालेली प्रवासी बोट मांडव्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह 78 जण बोटीत होते.
अलिबागजवळ बोट खडकावर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर बोट एका दिशेने कलंडली होती. मात्र मांडवा पोलिस कर्मचारी प्रशांत घरत आणि सद्गुरु कृपा बोटीचे दोन खलाशी बचावकार्याला आले.
दरम्यान, पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन बहुतांश प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहचवण्यात आले. अन्य काही जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले. सर्व प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यामुळे मोठा अपघात टळला.
ट्रेंडिंग बातम्या-
राष्ट्रवादी सोडल्यापासून उदयनराजेंच्या संपत्तीत इतकी घट!
डबे तर पोहचवूच पण जनजागृतीही करू; कोरोनाला पिटाळण्याचा डबेवाल्यांनी उचलला विडा
महत्वाच्या बातम्या-
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी
कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS
मोदी सरकार म्हणजे सुटाबुटातलं लुटारू सरकार- बाळासाहेब थोरात
Comments are closed.