बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या अभिनेत्याला ओळखलत का? याआधी न्युड फोटोशुटमुळे आला होता चर्चेत

मुंबई | अभिनेता आणि सुपर मॉडेल मिलींद सोमन याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. मिलींद नेहमीच सोशल मीडियावर  अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. तो अनेकवेळा स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. मात्र त्याने शेअर केलेल्या या फोटोवर कमालीच्या प्रतिक्रीया मिळताना दिसत आहेत. कारण मिलींदने त्याचा बालपणीचा तो 6 वर्षाचा असतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यातच त्याने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळेही या फोटोला अधिक पसंती मिळताना दिसत आहे.

मिलींदने त्याचा बालपणीचा शेतकऱ्याच्या वेशभूषेतला फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे ,”मी 6 वर्षाचा असताना मला शेतकरी व्हायचं होतं. 50 वर्षानंतर मी शेतकरी झालो. सध्या खुपदा असं ऐकायला मिळत आहे की, भाज्यांना हिरवा आर्टिफिशीयल रंग लावला जातो आणि फळांना पिकवण्यासाठी इंजेक्शन्स दिले जातात. त्यापेक्षा स्वत: तुम्ही शेती केलेली कधीही उत्तम.” असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

याआधीही मिलींद सोमन अनेकवेळा चर्चेत आला आहे. याआधी तो त्याच्या बोल्ड फोटोशुटमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने काही दिवसांपूर्वी गोव्याच्या बीचवर काढलेल्या न्युड फोटोमुळेही चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या फोटोमुळे बरेच वाद पेटल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर त्याने त्याच्यापेक्षा 25 वर्षाने लहान असलेल्या अंकिता कंवर हिच्याशी लग्न केल्याच्या बातमीवरून चर्चेत आला होता. शिवाय या दोघांनी शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळेही मिलींद नेहमी लक्ष वेधून घेतो. यावेळी चाहत्यांनी त्याच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे.

मिलींदला 1995 मध्ये आलेल्या अल्बम साँग मेड इन इंडियामधून अधिक प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याने काही मालिकांमध्ये काम केलं होतं. शिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात त्याने महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तो फिअर फॅक्टर -खतरों के खिलाडीमध्येही झळकला होता. यानंतर त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपला पाय रोवला आहे. अॅमेझॉन प्राईम सिरीजच्या ‘फोर मोर शॉट्स’ या वेबसिरीजमध्ये त्याने अभिनय केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

 

थोडक्यात बातम्या

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

‘हे कृत्य राक्षसी’; पुण्यातील घटनेवर अजित पवार संतापले

पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघांना संताप अनावर, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More