मुंबई । प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी कोणीही उत्सुक असतं. आणि त्यामध्ये जर सेलेब्रेटी म्हणलं तर त्यांच्या चाहत्यांना त्या गोष्टीची फार ओढ असते. जर चाहत्यांना समजलं की, याच्या आयुष्यामध्ये हे चालू आहे की, मग लगेच त्या सेलेब्रेटीला सोशल मीडियावर ट्रॉल केलं जातं किंवा त्याची चर्चा होते.
टीव्हीवर असे काही टोक शो सुरु आहेत. ज्यामुळे सेलिब्रेटींच्या आयुषात होणारे किस्से किंवा त्यांच्या आयुष्यातल्या खासगी गोष्ट याची चर्चा केली जाते. आणि त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची अधिक पसंती देखील मिळते.
करण जोहरचा वादग्रस्त शो ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन सध्या सुरु आहे. या शोच्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी हजेरी लावली तर दुसऱ्या भागात नव्या तारखा अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सारा आली खान यांनी हजेरी लावली. शोमध्ये खूप चर्चा रंगल्या, जान्हवीने तिच्या आयुष्यात घडलेले काही खास आणि चक्कीत करणारे किस्से सांगितले.
दरम्यान, शो सुरु असताना करणने जान्हवी आणि सारा या दोघींचं गुपित उघड केलं. कोरोनाच्या आगोदर दोन भावांना डेट केलं होतं याचा खुलासा करणने कार्यक्रमात केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया आणि शिखर पहारिया यांना दोघींनी डेट केलं आहे. जान्हवी आणि सारा या दोघींची मैत्री खूप घट्ट आहे अनेकदा त्यांनी ही गोष्ट कार्यक्रमात जाहीरपणे सांगितली. करण नेहमीच त्याच्या कार्यक्रमात अनेक मोठमोठ्या सेलेब्रेटीची खासगी गोष्टींचे खुलासे करत असतो आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक वाट पाहत असतात.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका
“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”
सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल
“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
Comments are closed.