बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मलायका तरीही तू म्हातारीच दिसतेस’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई | बॉलिवूड मधील काही कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनेत्री मलायका अरोरा देखीलही कारणाने चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांबर अनेक गोष्टी शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर मलायका काहीवेळा वर्क आऊटचे व्हिडीओ शेअर करते. तर काही वेळा आपले बोल्ड फोटोज शेअर करत चाहत्यांना भुरळ घालते.

पुन्हा एकदा मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मलायका चांगलीच ट्रोल झाली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुप्लोने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हुप्लोने शेअर केलेल्या या व्हिडीओत मलायका उजळ त्वचेसाठी टीप्स देताना दिसत आहे.

या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मलायकाला चांगलंच ट्रोल केलं आहे.  व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला की,  ‘मलायका तरीही तू म्हातारीच दिसतेस.’ तर दुसरा एक युजर म्हणाला, ‘फेक फिल्टर क्वीन.’ मलायकाच्या या व्हिडीओला 20 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

दरम्यान, मलायका सिनेमांपेक्षा आपल्या फिटनेसमुळे खूप जास्त चर्चेत असते. ती अलीकडे खूप कमी चित्रपटांमध्ये दिसते. मात्र, रिऍलिटी शोजमध्ये जज म्हणून बहुतेकदा ती छोट्या पडद्यावर झळकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

सकारात्मक बातमी! जन्मताच आईचं छत्र हरपलेल्या नवजात बालकाने 19 दिवसात केली कोरोनावर मात

“मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शरद असं पवारांना कधीच वाटलं नाही”

कोरोनाने 6 वर्षीय मुलगा दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केला जीवघेणा हल्ला

‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न होता’; राज्यातील ‘या’ पक्षाच्या पक्षप्रमुखांचा खळबळजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More