इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये २ बॉम्बस्फोट, १९ जण ठार

Photo- AP

लंडन | ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये झालेल्या २ बॉम्बस्फोटांमध्ये १९ जणांचा मृत्यू झालाय तर ५० हून अधिक जण जखमी झालेत. प्रसिद्ध गायिका अरियाना ग्रॅण्डचा कार्यक्रम सुरु असताना हा स्फोट झाला.

मँचेस्टर एरिनामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम संपण्यासाठी काही वेळ शिल्लक असताना हे स्फोट झाले. यावेळी २० जणांचा मृत्यू झाला तर नागरिक सैरावला पळाल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

 

पाहा व्हिडिओ- https://www.facebook.com/thodkyaat/videos/753973788095344/