लंडन | प्रेमभंग झाल्यानंतर किंवा प्रेमात धोका मिळतो तेव्हा दुःख असह्य होते, रायन शेल्टन नावाच्या व्यक्तीचे जेस अल्डरिज या 24 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या काळात जेसची आई जोर्जिना ही रायन सोबत प्रेमसंबंधात आली.
28 जानेवारीला जेस आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयातून घरी परतल्यानंतर तिला धक्काच बसला, कारण जेसची 44 वर्षीय आई रायन सोबत पळून गेली असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. ‘मेट्रो’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केलं आहे. हा सर्व प्रकार इंग्लंडमध्ये घडला आहे.
माझी आई नेहमी रायन सोबत फ्लर्ट करत असायची. मी सुरुवातीला कधी त्या गोष्टींना महत्त्व दिलं नाही पण नंतर या गोष्टी वाढल्यामुळे मी त्या दोघांना याबाबत विचारलं की, तुमच्यामध्ये काही प्रेम संबंध वगैरे आहेत का? तर त्या दोघांनी यावर थेट नकार व्यक्त केला होता. माझी चूक झाली मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. काही दिवसांपूर्वी मी मुलाला जन्म दिल्यानंतर रायनने त्या दोघांच्या नात्याची कबुली एका मेसेजद्वारे दिली आणि आपलं नातं संपवण्याबद्दल कळवलं असल्याचं जेसने सांगितलं आहे.
खरं तर आपल्या नातवावर प्रेम करायचं आणि मुलीला अशा परिस्थितीत सांभाळायचं सोडून माझी आई माझ्याच बॉयफ्रेंड सोबत पळून गेली असल्याचं पाहून मला खूप दुःख झालं आहे, असंही जेसने यावेळी बोलून दाखवलं.
रायन आणि जोर्जिना हे दोघेही आता नवीन घरात राहतात आणि त्यांनी समाज माध्यमावर आपले प्रेम संबंध मान्यही केले आहेत. आपण कोणावर प्रेम करायचं हे सर्वस्वी आपला स्वतःच निर्णय असतो असंही जेसच्या आईनं बोलून दाखवलं आहे.
थोडक्यात बातम्या –
पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!
होम क्वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई
“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”
Comments are closed.