बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लांच्छनास्पद! महात्मा फुलेंचं नाव असलेल्या विद्यालयात फीसाठी विद्यार्थ्याला मारहाण

पिंपरी | महात्मा फुलेंच्या नावानं असलेल्या महाविद्यालयात फी भरण्याच्या कारणावरुन विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. शुभम बारोठ असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद आहेत पण तरीही विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारण्यात येत आहे. फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जात आहे. जर फी भरली नाही तर रिजल्ट मिळणार नाही अशा भाषेत विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जातेय. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला आणि 50 टक्के फी माफ करण्याची मागणी केली होती. महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी ही मागणी मान्य केली होती आणि विद्यार्थ्यांना एक अर्ज करण्यास सांगितलं होतं.

दरम्यान, बुधवारी काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे अर्ज घेऊन गेले होते पण प्राचाऱ्यांनी फी माफ करण्यात साफ नकार दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी त्याला खूप खालच्या भाषेत उत्तरे द्यायला सुरुवात केली. शुभम बारोठ या विद्यार्थ्याने आपला मोबाईल घेतला आणि प्राचार्यांना कॅमेऱ्यामध्ये सर्व बोलण्यास सांगितले, मात्र दरवाजा लावून शुभमला ऑफिसमध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला गेला. शुभमने दरवाजा उघडण्यासाठी त्याला धडक दिली असता त्याची काच फुटली आणि त्याचा डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली. यानंतर तेथील कॉलेज स्टाफमधील 15 ते 20 लोकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप शुभमने केला आहे.

जखमी झालेल्या शुभमला दवाखान्यात नेण्यात आलं नाही. विद्यालयाने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सर्व मुलांना चौकीत नेले आणि बसवून ठेवले पण महाविद्यालयावर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दुसरीकडे ABVPने या प्रकरणाची दखल घेतली. शुभमला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले.

प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी याप्रकरणी माफी मागितली लावली. तसेच विद्यार्थ्यांची 50 टक्के फी माफ करावी आणि शुभमला झालेल्या दुखापतीची भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केलीय. यावेळी महाविद्यालयाच्या जनरल बॉडी सदस्य आणि नगरसेवक सांजोग वाघेरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिले व ज्या लोकांनी शुभमला मारहाण केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे प्रथमेश रत्नपारखी, पुणे विभाग संगठन मंत्री रोहित राऊत, महानगर संघटन मंत्री अशोक सैनी, गौरव वाळुंजकर, ऋत्विक देशपांडे, शुभम पोरे, संभाजी शेंडगे, अरविंद नागवी या कार्यकर्त्यांनी या भोंगळ कारभाराच्या विरोधात आवाज उठवला आणि महाविद्यालयावर व प्राचार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

थोडक्यात बातम्या

“येत्या 15 दिवसात खड्डे भरा अन्यथा, तुम्हालाच खड्ड्यात भरावं लागेल”

IT कर्मचाऱ्यांची दिवाळी! आठवड्यातून 3 दिवस सुट्टी अन् 4 दिवस काम

अभिनेत्री श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली; ‘या’ कारणामुळे केलं रुग्णालयात दाखल

“आता तरी केंद्र सरकार याचा विचार करणार आहे का?”

“धर्मभेद आणि जातीभेद विसरा, सर्वांना बरोबर घेऊन चालणं तेच खरं हिंदुत्व”

गुलाबनंतर आता ‘या’ वादळाचा धोका; महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More