बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज ठाकरे चुहा है’, भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी उत्तर प्रदेशातील राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसेकडून (MNS) राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असताना भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brujbhushan Singh) यांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला. तर राज ठाकरेंचा माफीनामा येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज ठाकरेंना भेटू नये, असा सल्ला देखील सिंह यांनी दिला आहे.

बृजभूषण सिंह यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. तर ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चुहा है’, अशा घोषणा अयोध्येत उत्तर भारतीयांकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविरोधात मी आधीपासून बोलतोय आणि त्याची निंदा करतोय. राज ठाकरेंनी माफी मागितली तर उत्तर भारतीय त्यांना माफ करतील. मात्र, तोपर्यंत दिल्लीतून फोन आले तरी आता आंदोलन मागे घेणं शक्य नाही, असं वक्तव्य खासदार बृजभूषण सिंह यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

टेंशन वाढलं! राजेश टोपेंनी दिले कोरोनाच्या चौथ्या लाटेचे स्पष्ट संकेत

कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी चुकुनही करू नका ‘ही’ चूक

उष्णतेच्या लाटेसह राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘जेव्हा आदित्य ठाकरेंना तुरूंगात टाकण्यात येईल तेव्हा…’; नवनीत राणांना संताप अनावर

देशातील महागाईचं सदाभाऊ खोत यांनी केलं समर्थन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More