सत्ता येण्याआधीच पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच; बसपा म्हणे, राहुल नव्हे मायावतीच बेस्ट!

नवी दिल्ली | सत्ता येण्याआधीच विरोधकांमध्ये पंतप्रधानपदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. बसपाने राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं बसपाचं म्हणणं आहे. बसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी ही भूमिका मांडली आहे. 

मायावती ज्येष्ठ नेत्या आहेत. राहुल गांधींपेक्षा त्यांना जास्त अनुभव आहे. त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत, असं भदौरिया यांनी म्हटलंय. 

दरम्यान, राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, अशी काँग्रेसमधील मोठ्या गटाची भूमिका आहे. त्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मित्रांच्या आरोपांमुळे तरुण व्यथित; व्हॉट्सअॅपवर 10 स्टोरीज टाकून आत्महत्या

-रायगडमध्ये राष्ट्रवादी संपली, शेतकरी कामगार पक्ष संपत चालला आहे!

-शिवसेनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीश्वरांकडे साकडं!

-राजू शेट्टी महान माणूस; त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं- सदाभाऊ खोत

-गोव्यात काँग्रेसला जोरदार धक्का… 2 आमदारांचा राजीनामा; भाजपध्ये प्रवेश करणार?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या