बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कलम 370 रद्द करून फार मोठी चूक केली, त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय”

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षापासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या हत्याकांडांमुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवादाविरोधात सरकारकडून कडक कारवाईची मागणी लोक सातत्याने करत आहेत. मात्र याकडे केंद्र सरकार दुलर्क्ष करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दशकामंध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या प्रकरणावरून मला काहीही राजकारण करायचे नाही, परंतु माझ्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. तो आता जास्तच वाढत आहे. याचा अर्थ असा नाही की एक विशिष्ट नेता किंवा व्यक्ती दहशवादाच्या बाजूने उभी आहे. त्याचं मुळ कारण म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यामुळे दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून फार मोठी चूक केली आहे. त्यामुळे दोन भागात राज्य विभागले गेले. कलम 144 आणि राज्यात कर्फ्यू लावून जवळपास 16,000 लोकांना तुरूंगात डांबलं, यामुळे परिस्थिती आणखीनच वाईट झाली. याबद्दल केंद्र सरकारने पुन्हा एकदा विचार करावा, असंही गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.

दरम्यान, नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून देशात दहशतवादी कारवाया वाढल्याचा आरोप विरोधक केंद्र सरकावर सतत करत आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच जम्मू-काश्मीरमध्ये अनेक नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण

“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”

दबाव आला तरी सहन करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राहुलचा धमाका, रोहितची तुफान खेळी; ऑस्ट्रेलियावर भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय

अन् नगरसेवकांच्या वादावरून नाना पटोले आणि अशोक चव्हाणांनी लावला डोक्याला हात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More