बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई | राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Minister Aslam Shaikh) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहीर कार्यक्रमात तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गायकवाड आणि शेख यांच्याविरोधात आर्म्स कायद्यानूसार (Arms Act) गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी तलवार नाचवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काॅंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इमरान प्रतापगडी यांच्या कार्यक्रमाचं आयोजन मुंबई काॅंग्रेसच्या वतीनं करण्यात आलं होतं. तेव्हा या ठिकाणी कार्यक्रमात तलवार घेतलेले मंत्र्यांचे फोटो व्हायरल  झाले होते.

दरम्यान, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मग काॅंग्रेस नेत्यांवर का नाही, असा सवाल कंबोज यांनी मुंबई पोलिसांना केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुलींची ‘ही’ पाच सिक्रेट मुलांना माहित असावी, नक्कीच होईल फायदा

शाळकरी मुलांसाठी शिक्षण विभागानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“आमदारांना घरे देऊ नयेत”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय राडा; भाजपच्या पाच आमदारांचं निलंबन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More