बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणाबाबत धक्कादायक माहिती समोर!

नवी दिल्ली | देशात सध्या, शैक्षणीक, सामाजिक, राजकीय, उन्नतीसाठी आरक्षण देण्यात आलं आहे. विविध आरक्षणासाठी देशात आंदोलन होत आहेत. यातच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशातील ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा आकडा नेमका किती आहे. प्रश्नासह ओबीसींचं राजकीय आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे. देशातील ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध नसल्याने देशातील ओबीसी आरक्षण प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी महत्वाचा असणारा इम्पिरिकल डाटा देण्यास नकार दिला आहे. परिणामी राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.

राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना केंद्र आणि राज्य यांच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने लवकरात लवकर आम्हाला इम्पिरिकल डाटा द्यावा असं, ठाकरे सरकारचं म्हणणं आहे. पण केंद्र सरकारने यावर नकार देताना 4 आठवड्यांचा कालावधी वाढवून घेतला आहे.

इम्पिरिकल डाटाचा वाद आता वाढण्याची चिन्ह आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. परिणामी या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या अभावी होणार आहेत. राज्यातील ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार आता काय भुमिका घेतं याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

”देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, मी जिंकले नाही तर…”

“भारतात बसून अंग मोडून आलं होतं, ती खास विमानंसुद्धा धूळखात पडून होती”

जिंकलेला सामना गमवायची पंजाबला सवय झाली आहे – अनिल कुंबळे

“सव्वा रुपया असो किंवा सव्वा कोटी मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे”

नव्या नवरीचं वागणं पाहून सासऱ्यांना आला ह्रदयविकाराचा झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More