बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर राजकीय आरोप- प्रत्यारोपाने चांगलाच जोर धरला आहे. प्रत्येकजण इतरांवर बोट करत आहे. निधी मिळत नसल्याचं सांगत बंड केलं, अस बंडखोर म्हणत आहेत. युती पसंद नसल्यानं शिवसेना फुटल्याचं म्हणत आहेत. काही जणांनी राऊतांचं नाव घेतलं तर कोणी राष्ट्रवादीचं नाव घेतलं आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

शिवसेना फुटण्याला राष्ट्रवादीचे शरद पवार जबाबदार नसून याला सर्वस्वी शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) जबाबदार असल्याचं आठवले म्हणाले आहेत. 2019 च्यावेळी काॅग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा सल्लाही राऊतांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. महाविकास आघाडी स्थापनेला अगदी सुरूवातीपासूनच विरोध होता. राष्ट्रवादीसोबत सत्ता नको अशी हात जोडून विनंती केली होती. ही युती अनैसर्गिक होती. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) करत आहे. हे देखील मी सांगत होतो. इतकं सांगूनही ऐकलं नाही. त्यामुळेच पक्षावर ही वेळ आली आहे, असं ते यावेळी म्हणाले होते. त्यांनी शिवसेना फुटण्यामागे जेष्ठ नेते शरद पवार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

शिंदे गटाकडून नवे गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 12 खासदारांसोबत दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली त्यांत शेवाळेंनी एक गौप्यस्फोट केला. मोदींबरोबर युतीसाठी प्रयत्न करा, असा आदेश उद्धव ठाकरेंकडून देण्यात आला होता. संजय राऊत यांच्यामुळे हा डाव फिस्कटला, असंही ते म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या

“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे जे त्यांच्या नादी लागले ते…”

उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?

चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा

राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू 15 वर्षांपूर्वीप्रमाणे इतिहास रचणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More