Top News

एकनाथ खडसेंना कोणतं मंत्रिपद मिळणार?, छगन भुजबळ म्हणाले…

मुंबई | एकनाथ खडसेंना कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय शरद पवारच घेतील, असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांचं स्वागतच आहे. आम्ही सर्व त्यांचं आनंदानं स्वागत करणार आहोत, असं छगन भुजबळ म्हणालेत.

खडसेंना कोणतं मंत्रिपद देण्यात येणार आहे? त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात येणार आहे?, असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर खडसेंना कोणतं मंत्रिपद द्यायचं याबाबत पवारच निर्णय घेतील, असं भुजबळ म्हणाले.

खडसे यांनी काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा त्याग करत असल्याचं जाहीर केलं होतं. याच पत्रकार परिषदेत त्यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“अमृता फडणवीसांबद्दल खडसेंनी अशीच वक्तव्ये केली असती तर फडणवीसांनी खपवून घेतली असती का?”

‘माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही’; अंजली दमानिया यांचा खडसेंना इशारा

‘अहो जनाची नाही, मनाची तरी बाळगा’; भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या म्हणत शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाने हसन मुश्रीफांची गाडी रोखली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या