मुंबई | राज्यात मान्सूनचे आगमन लांबले असताना अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवासाला अडथळे निर्माण झाल्याने मान्सून पुढे सरकण्यासाठी विलंब होत आहे. मान्सूनला अनुकूल वातावरण मिळाले तर महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर प्रदेश आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांमुळे छत्तीसगड, रायलसीमापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मध्यमहाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यास मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने होऊ शकते. त्यातच दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातही हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. औरंगाबाद, जालना, बीड,परभणी तसेच बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील पूर्वमोसमी पाऊस मान्सूनच्या आगमनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मुख्यमंत्रीपद सांभाळणं सोपं नाही”
‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’; विनायक मेटे संतापले
“भाजपने आपल्या बेलगाम प्रवक्त्यांच्या डोक्यात अक्कल घालावी”
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे
काँग्रेसकडून ‘या’ दोन नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर
Comments are closed.