महाआघाडीच्या चर्चांना वेग; चंद्राबाबू शरद पवारांच्या भेटीला?

नवी दिल्ली | भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पुन्हा वेग येण्याची शक्यता वाढली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे या भेटीत तिसऱ्या आघाडीबद्दल ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास चंद्राबाबू शरद पवारांना भेटतील. 

दरम्यान, आघाडीचे नेतृत्व कोणाकडे द्यावे यावरून आघाडीबाबत आतापर्यंत ठोस निर्णय होत नव्हते. त्यामुळे ही चर्चाही मंदावली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सावधान!!! महाराष्ट्राला या आजाराचा विळखा वाढतोय…

-ऐन दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका

-पंकजा मुंडेंचा स्तुत्य उपक्रम; बचत गटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी परदेश दौरा!

-हा व्हीडिओ पाहाल तर रोहित शर्माबद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल!

-… मंत्री झालो आणि सहकाराचा ‘जाच’ सुरू झाला- सुभाष देशमुख

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या