Top News औरंगाबाद महाराष्ट्र

“बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

औरंगाबाद | छत्रपती संभाजी महराजांचं नाव औरंगाबादला देण्यात यावं, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. मात्र या नामंतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. अशातच औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतराला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. कॉंग्रेसही विरोध करणार नाही. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये काहीही ही मतभेद होणार नाही, असंही खैरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या 23 जानेवरीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी ही मागणी केली आहे. मात्र काँग्रेसने आपला विरोध जाहीरपणे दर्शवला आहे. त्यामुळे खैरेंच्या मागणीवर मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भंडाऱ्यातील मन सुन्न करणाऱ्या घटनेवर मोदीही हळहळले; म्हणाले…

भंडाऱ्यातील पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत- राजेश टोपे

गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे निधन

…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे

“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या