पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मैदान दिलं जात नसल्याचा आरोप केला जातोय. यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. आचारसंहितेत सरकारची कोणतीही भूमिका नसते, असं ते म्हणाले.
युतीच्या बंडावर बोलताना, “सर्वांना न्याय देण्यात मर्यादा येतात. मला न्याय मिळाला, मात्र मेधा कुलकर्णींवर अन्याय झाला. राज्यात भाजपला काही ठिकाणी जागा मिळाल्या नाही, तर काही ठिकाणी शिवसेनेला मिळाल्या नाही. मात्र राज्याचा आम्हाला विकास करायचा आहे. त्यामुळे अन्य गोष्टीत अडकून पडू नये,” असं आवाहन त्यांनी केलं.
युतीतील मित्रपक्षांना भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपाने दीर्घकाळ कोणावर अन्याय केलेला नाही. कदाचित प्रसंगानुसार कधी झाला असेल. रामदास आठवले यांच्याबरोबर सदिच्छा भेट झाली, मात्र तशी काही नाराजी नाही,” असं ते म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध होता. मात्र मयुरेश अरगडे व राहुल जोशी या दोघांनी उमेदवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि चंद्रकांत पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत – https://t.co/Xov2p2BdV9 @Uddhav_Thakeray @rautsanjay61
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
महत्वाच्या बातम्या-
आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित; हे आहेत महत्त्वाचे मुद्देhttps://t.co/e8pDUh9eBc @INCMaharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
तो फ्लॅट आजही माझ्या नावावर आहे- जितेंद्र आव्हाड https://t.co/O7N0ZyjeYD @Awhadspeaks @NCPspeaks #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
…म्हणून 2000ची नोट होणार एटीएममधून हद्दपार! – https://t.co/Q7DwSNEu3t #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 7, 2019
Comments are closed.