महाराष्ट्र मुंबई

फडणवीसांनी दोन तासात कितीतरी प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

मुंबई | तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

जेवढं लॉकडाऊनमध्ये कडक नव्हतं त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी नेमकं करायचं तरी काय?, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची पोलिसांकडून होणार चौकशी

“सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणं कठीण, सरकारवर कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते”

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमणार- अमित देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या