कोल्हापूर महाराष्ट्र

“मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी हे सरकार बदलेल”

कोल्हापूर | मंत्र्यांच्या गाडीचे टायर बदलण्यापूर्वी हे सरकार बदलेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेणाऱ्या मुलाबद्दल हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल?, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

एकत्रित निवडणूक लढवताना शिवसेनेने युतीला मतदान मागितलं होतं. युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे मते मागितली होती. पण निवडणुकीनंतर ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने अनैतिक युती करुन सरकार स्थापन केलं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या