Top News राजकारण

ईडीवरून सीडी लावण्याच्या खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवलीये. तुम्ही माझ्यामागे ईडी लावलीत तर मी तुमची सीडी लावेन असं वक्तव्य खडसे यांनी केलेलं. या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय.

“ईडी स्वतंत्र संस्था असून त्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो. आणि राहिला प्रश्न सीडीचा तर तर तुम्ही खुशाल सीडी लावावी. तुम्हाला कोणी रोखलंय,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय.

दरम्यान ईडी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. तसंच भाजप ईडी मागे लावते असं त्यांना वाटतंय का?, असा सवालंही चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना केला आहे.

पुण्याजवळील भोसरी इथल्या भूखंडासंदर्भात ईडीने एकनाथ खडसेंना नोटीस धाडली आहे. यावेळी त्यांना 30 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.

थोडक्यात बातम्या-

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलास

‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत

दिल्लीतील काही लोकं टोमणे मारून माझा अपमान करतात- पंतप्रधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या