Top News

“मी खुर्चीत बसतो, सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या”

मुंबई | उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोक भावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. पण मला जर विचारालं तर सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी सांगितलं असेल, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली- राज ठाकरे

कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कलर्सने मुख्यमंत्र्यांना आणि राज ठाकरेंना पाठवलेल्या माफीनाम्यात ‘हा’ आहे फरक; खोपकरांची ट्विटद्वारे माहिती

‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला

‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या