उस्मानाबाद | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थोरातांची खिल्ली उडवली आहे.
मंदी एका देशातून दुसऱ्या देशात जात नसते, जगभर मंदी असते, त्यामुळे थोरातांनी मंदी काय असते, हे समजून घ्यावे असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी थोरातांना दिला आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.
सध्याचे सरकार आधीच्या सरकारच्या सर्व योजना रद्द करत आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू देत, अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानी चरणी केल्याचं सांगितलं.
दरम्यान, कर्जमाफी फसवी ठरत असून नवीन घोषणा केली जात नाही, महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिली असून स्थगिती देणारं सरकार अशी या सरकारची ख्याती होत चालल्याचा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘पांघरूण’ पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी; टीझर प्रदर्शित
शासकीय कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारचं मोठं गिफ्ट; 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा
महत्वाच्या बातम्या-
इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा नाहीतर…; तृप्ती देसाईंचा इशारा
“दिल्लीच्या पराभवाला मोदी नव्हे अमित शहा जबाबदार”
तुमची ‘शिवभोजन’ तर आमची ‘दीनदयाळ’; भाजपकडून इतक्या रुपयात जेवण
Comments are closed.