बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाज कधीही पुढे जाणार नाही याची काळजी घेतली”

पुणे | मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. इतर मुद्द्यांसोबतच विरोधी पक्षाने सत्तेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होतं. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण असल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली असल्याचंही पाटील म्हणाले.

दरम्यान, अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला असल्याचं म्हणत चंद्रकात पाटलांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

ब्रेकिंग! दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या कोचला भीषण आग 

मनोरंजन क्षेत्रात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे ‘हे’ दोन मोठे कलाकार कोरोनाच्या जाळ्यात!

खुशखबर! फक्त 1.11 लाखात घरी न्या किया सेल्टाॅस कार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम

बकरीसमोर पाऊट करणं पडलं महागात, बकरीने केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More