बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने .यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या दोन दिवसांचं अधिवेशन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दोन दिवसाच्या अधिवेशनानं काय होणार किमान महिनाभरासाठी तरी अधिवेशन घेतलं पाहिजे. तरच जनतेच्या समस्यांवर चर्चा होईल. कोरोनाचं निमित्त पुढे करून अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेतलं जात आहे. ही सरकारची पळवाट आहे. हे सरकार कोरोनाला घाबरत नाही तर विरोधी पक्षाला घाबरत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील पालघरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकावर टीका केली आहे. बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे ठाकरे सरकारला जास्त दिवस आधिवेशन ठेवायला भीती वाटत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

“सरकार अधिवेशनापासून पळ काढतय, या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध”

“तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये ‘हा’ फरक आहे”

“…तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More