“संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाही तर शरद पवारांचे समर्थक”
कोल्हापूर | राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेनेची (Shivsena) युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात ईडीने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त केल्यापासून भाजप-सेनेतील वाद आता शिगेला पोहोचला आहे.
संजय राऊतांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरात बोलताना संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा शिवसेनेचे नव्हे तर शरद पवार यांचे समर्थक आहेत. आपण वारंवार सांगत होतो पण ते काल्याच्या घटनेवरून सिद्ध झालं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. इतरांच्या बाबतीत निरीच्छ असणारे शरद पवार मात्र राऊतांच्या गळ्याशी प्रकरण आलं की मोदीजींची भेट घेतात, यावरूनच सगळं सिद्ध होतं, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांवर कारवाया केल्या. त्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधानांना भेटून हा अन्याय आहे व तो थांबवावा असे सांगयाचे सुचले नाही, असा घणाघात देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?, वाचा एका क्लिकवर
राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?”, नारायण राणेंचा शिवसेनेला सवाल
कोरोनानंतर नव्या व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ आजाराची लक्षणंही कोरोना सारखीच
मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलंय का? – संजय राऊत
Comments are closed.