कोल्हापूर | कोल्हापूर दक्षिण विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. पराभवानंतर आता राज्यात मोठी राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानं पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सत्यजीत कदम यांच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत तीन पक्ष विरूद्ध एक पक्ष अशी लढत झाली. आम्ही एकट्यानं 77 हजार मतांचा आकडा क्राॅस केला. मतदारांचा कौल आम्ही मान्य करतो, असं पाटील म्हणाले आहेत.
सत्यजीत कदम एकटे लढले तर मी लढलो असतो तर काय झालं असतं. मी लढलो नाही त्यामुळं मला हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही, असं पाटील म्हणाले आहेत. आम्ही प्रयत्न करण्यात कुठं कमी पडलो नाहीत. पैशांचा, दंडुकेशाहीचा, जातीचा वापर करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी काॅंग्रेसवर केला आहे.
दरम्यान, भाजपनं हिंदूत्वाचा मुद्दा मोठ्या जोरदारपणे कोल्हापूर निवडणुकीत उपस्थित केला होता. पण कोल्हापूरात नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभव स्विकारावा लागल्यानं पाटील यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
थोडक्यात बातम्या –
‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणातील पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड!
“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही”
IPL 2022: CSKला मोठा धक्का! धडाधड गडी टिपणारा ‘हा’ स्टार गोलंदाज संघाबाहेर
“राज ठाकरे हे मराठी ओवैसी, ते फक्त हिंदूंना भडकवतात”
मोठी बातमी! जयश्री पाटलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू
Comments are closed.