महाराष्ट्र मुंबई

कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद

मुबंई  | कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी जायचे आहे, मात्र सरकारने परवानगी दिली नाही, असं चंद्रशेखर आझाद म्हणाले. कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी न्यायलयात जाण्याची गरज लागली तर न्यायालयात जावू, असा इशारा भीम आर्मीचे प्रमख चंद्रशेखर आझाद यांनी दिला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

दरवर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. मात्र, गेल्या वर्षी तुरुंगात असल्यामुळे येता आलं नाही. मात्र, यावर्षी कोणत्याही परिस्थिती कोरेगावा भीमाला जाणार असल्याचं चंद्रशेखर आझाद म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माननारे लोक कोरेगाव भीमा शौर्य दिवस साजरा करतात. महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीची मातृभूमी आहे. महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे, येत्या काळात येथे आंबेडकरीचळवळ वेगानं वाढेल, असं चंद्रशेखर आझाद म्हणाले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महिनाभर शेतकरी आंदोलन करत आहेत पण सरकार त्यांची बाजू ऐकून घेत नाही. सरकार ज्यावेळी बोलवेल त्यावेळी शेतकरी चर्चेसाठी जातात, पण सरकार त्यांचं म्हणनं ऐकून घेत नाही, असं आझाद म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं

‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल

मॅच फिक्सिंगच्या बंदीनंतर ‘या’ भारतीय खेळाडूची तब्बल 7 वर्षांनंतर संघात निवड!

“आता बघू… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की संभाजी राजेंचा स्वाभिमान की मुख्यमंत्री पदाची खुर्ची”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या