महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडे केल्याची माहिती आहे.

प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आल्याचं कळतंय.

यासंदर्भात महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. याबाबत एक स्मरणपत्रही पाठवण्यात आलं होतं, असं आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांविरोधात प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी येतील त्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल, असं आयोगाने म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्ण

IPL2020- गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी

बनावटी प्रचार करणाऱ्यांविरोधात हा आपला विजय आहे- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या