बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर दोन महिन्यात आरक्षण बहाल करून दाखवेल’; छगन भुजबळांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुंबई | ओबीसींचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर समाज रस्त्यावर उतरून तीव्र रोष व्यक्त करत आहे. तर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं होतं. त्यानंतर पावसाळी अधिवशेनात देखील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं होतं. त्यावर आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस, तुम्ही आमचे बॉस, तुम्ही आमचे नेते आहात. चला, राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचा डाटा केंद्र सरकारकडून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घाला. आम्ही सगळे तुमच्यासोबत येऊ. केंद्राने लगेच डाटा दिला, तर दोन महिन्यांत आघाडी सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल, असं खुलं आव्हान छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

फडणवीस शब्दच्छल करीत आहेत. 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी अधिसूचना काढल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी हा डाटा केंद्राकडे मागितला होता. तो कशासाठी? कारण या डाटाशिवाय आरक्षण टिकणार नाही, हे त्यांना ठाऊक होते, असा आरोप देखील त्यांनी फडणवीसांवर केला आहे. एससी, एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यानंतर 50 टक्क्यांच्या मर्यादेत उर्वरित आरक्षण ओबीसींना द्यावं, अशा ट्रिपल टेस्टच्या आधारे आरक्षण द्यावं, असं देखील त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आमचे सरकार त्या आधारे इम्पिरिकल डाटा तयार करून दोन महिन्यांत आरक्षण देईल. तसेही हे आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीच, ते आम्ही मिळवणारच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. गोपीनाथ मुंडेंनी ओबीसींसाठी सोबत काम केलं, जर फडणवीस त्यांचा वारसा सांगत असतील, तर त्यांनी मदत करावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. लोकमतच्या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते.

थोडक्यात बातम्या-

“फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता तोंड उघडायला तयार नाही”

“चंद्रकांत पाटील आणि भाजपने जनतेची माफी मागावी”

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती; असा करा अर्ज

सोन्याच्या दरात आज देखील वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More