बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् चक्क मंत्र्यांचा हरवलेला चश्मा सापडला महिला उमेदवाराच्या केसात, पाहा व्हिडीओ

भोपाळ | मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या एका प्रचार सभेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मध्य प्रदेशमधील मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह व्यासपीठावर उभ्या असलेल्या महिलेच्या केसात आपला चश्मा शोधताना दिसत आहेत. या घडलेल्या प्रकारावरून काॅंग्रेस पक्षाने शिवराज सिंह यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे.

शिवराज सिंह मध्य प्रदेशमधील सतनाच्या रेगाव मतदारसंघातील रेगाव याठिकाणी विधानसभेच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी एका नेत्याचं नाव सांगण्यासाठी मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह उठून उभे राहिले. त्यानंतर ते आपल्या खुर्चीवर परत बसण्यासाठी गेले. तेव्हा आपल्या खिशातील चश्मा शोधू लागले. त्यानंतर त्यांचा चश्मा मुख्यमंत्र्यांजवळ उभ्या असलेल्या महिला उमेदवारांच्या केसात अडकलेला दिसून आला.

चश्मा महिलेच्या केसात अडकलेला आहे, हे लक्षात आल्यानंतर लगेचच त्या मंत्र्याने तो चश्मा महिलेच्या केसातून काढला. हा सगळा प्रकार कळतच व्यासपीठावर बसलेले सगळेच जण हसू लागलेत. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. यावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या.

दरम्यान, घडलेल्या प्रकरणाबाबत अनेकांकडून खेद व्यक्त करण्यात आला. तर काहींनी हे प्रकरण महिलेशी छेडछाड केल्याचं सांगत अनेक प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर अनेकांनी यावर कमेंट् देखील केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

आर्यन खानचं समुपदेश केलं मग पुरावे द्या! नवाब मलिकांचं NCB ला खुलं आव्हान

“….म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबईतील कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More