‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरणही पेटलं आहे. विरोधकांनी ठाकरे सरकारवर या प्रकरणावरून टीका केली आहे. पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी दर महिन्याला 100 कोटी वसुल करायला लावले असल्याच आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. अशातच भाजप नेते निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्रावरून अनिल देशमुखांकडून वाझेंना दरमहा 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचं उघड झालं. शरद पवारांना माहिती नव्हती असं असू शकत नाही. उद्धव ठाकरेंना ब्रिफिंग देऊन सुध्दा त्यांनी काही केलं नाही म्हणजे त्यांचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा असल्याचं निलेश राणेंनी म्हटलं आहे. याआधी भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही? मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या 100 कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे, असं नारायण राणे म्हणाले होते.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली असल्याचा दावा पत्रात केला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करताना आठ पानी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. या पत्रामध्ये परमबीर सिंह यांची स्वाक्षरी दिसत नाही. मात्र अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी गोंधळ उडालेला दिसत आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्रावरून अनिल देशमुखांकडून वाझेंना दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे उघड झाले. पवार साहेबांना माहिती नव्हती असं असू शकत नाही. उद्धव ठाकरेंना briefing देऊन सुध्दा त्यांनी काही केलं नाही म्हणजे त्यांचा पण 100 कोटी मध्ये हिस्सा होता.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 20, 2021
थोडक्यात बातम्या-
गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई
बाबो! ख्रिस जॉर्डनने एका हातात घेतलेल्या अफलातून झेलवर सगळेच फिदा, पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्र्यानी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी- अनिल देशमुख
“आता कळलं का?,वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता”
Comments are closed.