…त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सांगली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत होती. जर निर्बंध शिथिल नाही केले तर आंदोलन करू, असा व्यापारी संघटनांनी इशारा राज्य सरकारला दिला होता. यावर बोलताना, राज्यातील जनतेच्या हिताची काळजी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नसल्याचं मुख्ममंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील दुकानांच्या वेळेत वाढ केल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी रात्री आठपर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र ज्या भागात कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या जास्त असेल त्या भागातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत तर कायदा मोडून दुकानं सुरु ठेऊ, अशी भूमिका पुण्यासह राज्यातील व्यापारी वर्गाने घेत राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाहीत. जनतेच्या हिताची काळजी अधिक महत्त्वाची असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून 11 जिल्ह्यांमधे निर्बंध कायम ठेवले आहेत.
दरम्यान, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड आणि पालघर यांचा समावेश आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी
मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; वाचा आकडेवारी
मेट्रोच्या ट्रायल रनवरून चंद्रकांत पाटील भडकले; अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाले…
‘दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव’; अरविंद सावंत संतापले
मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?
Comments are closed.