“जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”
मुंबई | राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा गाजत असताना बाबरी मशिद कोणी पाडली यावरून श्रेयवादाचं राजकारण रंगत आहे. बाबरी पाडली तेव्हा मी तिथे उपस्थित होतो, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.
फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टीका केली. 1192 साली बाबरी पडली तेव्हा फडणवीस 13 वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस आयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. लालकृष्ण अडवाणींनी 13 वर्षाच्या बालकाला आयोध्याला नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले, असा टोला जयंत पाटलांनी लगावला होता.
जयंत पाटलांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 1970 साली जन्मलेले देवेंद्र फडणवीस 1992 साली 13 वर्षांचे होते हे जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल. हेची फळ काय मम तपाला, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या पण आजवर बाबरीपतनात सहभागी असल्याचं कधीच सांगितलं नाही. इतके वर्ष त्यांनी माझ्यापासून ही गोष्ट का लपवली असा प्रश्न मला पडत आहे, असंही जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटलांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
‘बाबरी मशीद पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त १३ वर्षांचे,अडवाणींनी लहान मुलाचे प्राण धोक्यात घातले’ इति जंत पाटील.
१९७० साली जन्मलेले देवेंद्रजी १९९२ साली १३ वर्षांचे होते हे जयंत पाटलांचे गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल…
हेची फळ काय मम तपाला। pic.twitter.com/wc7cUw0hb9— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 3, 2022
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी! राणा दांपत्याला जामीन मंजूर
बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
मोठी बातमी! नवनीत राणांची प्रकृती खालावली, महत्त्वाची माहिती समोर
“स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा द्वेष करणं दुर्दैवी”
‘शत्रुघ्न सिन्हांनी माझं कौमार्य विकून सोनाक्षीला अभिनेत्री बनवलं’, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
Comments are closed.