बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला

मुंबई | 10 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री (CM) झाले. तर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व भाजपने (bjp) विश्वासदर्शक ठराव जिंकत अधिकृतपणे शिंदे सरकार स्थापन केलं.

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटला. शिवसेनेतील गळती कायम असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करत एक शायरी ट्विट केली. रूकने वाला वजह ढूढंता है, और जानेवाला बहाने असं ट्विट राऊतांनी केलं.

राऊतांच्या या ट्विटवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तुफान टोलोबाजी केली आहे. काय ती शायरी.. काय ती अदाकारी.. काय ती गुर्मी.. वाट्टोळं एकदम ओके, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला लगावला आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस मोठं होत आहे. आमदारांपाठोपाठ आता नगरसेवकही शिंदे गटात सामील होत आहेत. त्यात राऊतांनी बंडखोरांना उद्देशून शायरी ट्विट केली. राऊतांच्या या शायरीला चित्रा वाघ यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी.. काय डोंगार… स्टाईलने टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात

लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

‘… तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना बावरट करणारे ‘ते’ चार जण कोण?, गुलाबरावांचा रोख कुणाकडे???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More