पुन्हा रेल्वे अपघात, वास्को-द-गामा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली

पुन्हा रेल्वे अपघात, वास्को-द-गामा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली

लखनऊ | रेल्वे अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता वास्को-द-गामा एक्स्प्रेस रुळावरुन घसरलीय. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये हा अपघात झालाय. 

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वास्को-द-गामा एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. 

अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलंय तसेच डबे रुळावरुन हटवण्याचं काम देखील सुरु आहे. रुळाला तडे गेल्यानं हा अपघात घडल्याचं कळतंय. 

 

Google+ Linkedin