तनुश्री दत्ताला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही तिची माफी मागतो!

मुंबई | नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताची ‘सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ (सिन्टा)नं माफी मागितली आहे. सिन्टाचे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

तनुश्री दत्ताने 10 वर्षांपूर्वी या प्रकरणाची रितसर तक्रार सिन्टाकडे केली होती. याप्रकरणी सिन्टाने दुर्लक्ष केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. सिन्टाने तनुश्रीचा हा आरोप मान्य केला आहे.

तनुश्रीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सिंटाकडून आम्ही माफी मागतो. खरं तर माफी मागून तिला झालेला त्रास आम्ही कमी करू शकत नाही. पण तिच्यासोबत झालेला प्रकार अन्य कोणत्याही कलाकारासोबत घडणार नाही याची आम्ही पुरेपुर काळजी घेऊ, असं ‘सिंटा’नं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी बंड केले तर तुम्हाला थंड केल्याशिवाय राहणार नाही; गोटेंचा भाजपला इशारा

-आई म्हणाली, “वेळ पडली तर राजकारण सोड, मात्र पवार साहेबांना सोडू नको”

-आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दांडिया डान्स; पाहा व्हिडिओ

-गर्दी पाहून धक्का बसला वाटतं; थोडी चिक्की खा, बरं वाटेल -रुपाली चाकणकर

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती