शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

मुंबई | मुख्यमंत्र्यांकडून राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

 राज्य सरकारच्या या घोषणेनंतर लवकरच केंद्र सरकारचे पथक दुष्काळसदृश भागांची पाहणी करणार आहे. यानंतर दुष्काळाची घोषणा करण्यात येईल. तोपर्यंत राज्यातील 180 तालुक्यांमध्ये आतापासूनच दुष्काळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठवाड्यासह अनेक भागात पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री पंचांग काढून बसलेत- उद्धव ठाकरे

-मेकअप आणि कपड्यांवर वेळ वाया घालवू नका; मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा सल्ला

-सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल- शरद पवार

-पैशांची कामे पूर्ण होताच राजीनामे खिशात ठेवले जातात; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

-दारूच्या दुकानासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या